Share

निराशादायक! इस्त्रोची जीएसएलव्ही- एफ १० उपग्रह मोहीम अपयशी

Published On: 

🕒 1 min read

श्रीहरीकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची उपग्रह प्रक्षेपण मोहीम अपयशी ठरली आहे. आज पहाटे जीएसएलव्ही- एफ १० या प्रक्षेपकाने ५ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून ईओएस-०३ या कृत्रिम उपग्रहासह अवकाशात झेप घेतली.यावेळी इस्त्रोमधील शास्त्रज्ञ अतिशय उत्सुक होते. प्रक्षेपकाचे पहिले दोन टप्पे यशस्वी पार केले. मोहीम सुरू झाल्याननतर साधारण नऊ मिनिटामध्ये प्रक्षेपकाने १३० किलोमीटर एवढी उंची गाठल्यावर मोहिमेतील तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. यानंतर उपग्रहाला उंचीवर नेणारा क्रायजेनिक इंजिनाचा टप्पा सुरू झाला मात्र काही सेकंदातच या इंजिनासह उपग्रह नियोजित मार्ग भरकट असल्याचे दिसून आले.

 

यानंतर मात्र मिशन कंट्रोलमधील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंते यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली.प्रक्षेपणाची सर्व माहिती
इस्रोच्या संकेतस्थळावर दिली जात होती. त्यानंतर दहा मिनिटात या मोहिमेचा आढावा घेऊन इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी मोहीम अयशस्वी झाल्याचे स्पष्ट केले. जीएसएलव्ही- एफ १० हे रॉकेट जीएसएलव्ही- एमके २ या प्रकारातील होते. २५०० किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह भुस्थिर कक्षेत नेण्याची क्षमता असलेले आणि क्रायजेनिक इंजिनाचा समावेश असलेले जीएसएलव्ही- एमके २ असे याचे वैशिष्ट्ये होते. आजचे जीएसएलव्ही- एमके २ चे हे १४ वे उड्डाण होते. साधारण २००१ पासून याची सुरुवात झाली होती. यादरम्यान जीएसएलव्ही- एमके २ च्या प्रक्षेपणात सुरुवातीला पाच मोहिमांमध्ये ते अपयशी ठरले. त्यामुळे याला ‘नॉटी बॉय’ असेही म्हटले गेले. या उपग्रहामुळे भारतीय उपखंडातील विविध भागांची २४ तास छायाचित्रे घेणे शक्य होणार आहे. शेती, दुष्काळ-पूर परिस्थीतीवर लक्ष ठेवणे, सागरी क्षेत्र व्यवस्थापन, वातावरणातील धुकं-धुळ याबद्दलची माहिती अशा विविध उपयोगासाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

दरम्यान आजच्या मोहिमेत क्रायजेनिक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मोहीम अपयशी ठरली असल्याचे इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी स्पष्ट केले आहे. अमेरीका, रशिया, फ्रान्स, जपान, चीन या देशानंतर फक्त भारताकडे हे तंत्रज्ञान आहे. मात्र आजची मोहिम अपयशी झाल्याने कंट्रोल रूममधील सर्व शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर निराशादायक भाव आसून आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!