औरंगाबाद : पानचक्की जवळील मोडकळीस आलेल्या महेमुद दरवाजाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी नुकतीच पाहणी केली होती. यावेळी दरवाजा लगत असलेले अतिक्रमण त्वरित काढण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. या नुसार बुधवारी अतिक्रमण पथकातील अधिकाऱ्यांनी परिसरात भेट दिली. यावेळी मालमत्ता मधिल सामान हलविण्याकरिता त्यांना २४ तासांची मुदत देण्यात आली.
महानगरपालिका प्रशासक पाण्डेय यांनी शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन कामांची पाहणी केली. यावेळी प्रशासकांनी ऐतिहासिक महेमुद दरवाजाची पाहणी केली. सदरील दरवाजा सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. असे असतानाही नागरिक दरवाज्याच्या बाजूने जात असल्याने अपघाताची शक्यता आहे. तशी एक घटना घडली देखिल आहे. महेमूद दरवाजाचे काम सुरू केल्यानंतर ते पूर्ण होण्यासाठी काही महिन्याचा कालावधी लागेल. दरवाजाच्या बाजूला असलेले अतिक्रमण त्वरित काढण्याचे तसेच घाटी रुग्णालय ते महमूद दरवाजापर्यंत असलेले विद्युत पोल हटवण्याचेही आदेश त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले होते .
बुधवारी अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्यासह अतिक्रमण विभागातील अधिकारी परिसरात पोहोचले. यावेळी अतिक्रमण धारकांशी त्यांनी संवाद साधला. मालमत्ता मध्ये असलेले सामान इतरत्र हलवण्याकरिता मुदत मागितल्याने, त्यांना २४ तासांची मुदत देण्यात आली. यानंतर मनपा अतिक्रमण विभाग हे अतिक्रमण निष्कासित करेल. असेही निकम म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं ; राज्यातील हॉटेल्स, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
- देशभरात गेल्या तीन वर्षात एकूण 5,17,322 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी
- भाजपमध्ये साईडलाईन झालेले विखे, हर्षवर्धन पाटील यांनी ‘या’ कारणासाठी घेतली अमित शाहांची भेट
- भाजप आमदाराच्या मतदारसंघात शिवसेनेची रणनीती; दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश!
- चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु होणार ? ; ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
