Share

मुलीला पळवून नेल्याच्या आरोप करित चाकूने तरुणावर केले वार

Published On: 

औरंंगाबाद : कृष्णा कुठे आहे ? तो आमच्या मुलीला सोबत घेऊन गेला असल्याचे आरोप करून, घरासमोर जोरजोराने शिवीगाळ केली. राजु मनोहर विर (वय २६, रा. दहिहंडे गल्ली, चिकलठाणा) यांनी घरातून समविण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर शिवीगाळ करणाऱ्यांनी घरात प्रवेश केला. चाकुने राजु विर याच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या चुलत भाव व बहिण याच्यावरही हल्ला केला. तसेच घरातील कपाट, लाकडी पलंग, लोखंडी पेटीचे नुकसान केले. मुलीला परत आणले नाही. तर जीव घेऊ अशी धमकी दिली.

ही घटना ९ ऑगस्ट रोजी दहीहंड गल्ली चिकलठाणा येथे घडली. याप्रकरणी राजू विर याच्या तक्रारीवरून चाकु हल्ला, घराची तोडफोड करणाऱ्या संतोष देवराव भावले, अतुल गोजीनाथ भावले, सचिन गोजीनाथ भावले रा. सर्व वाळुज यांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!