मुंबई – कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने आता निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. मात्र लोकल साठी अजूनही सामान्य जनतेला प्रवास करण्यासाठी मनाई आहे. दोन डोस घेतलेल्यांना लोकल मधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली मात्र अजूनही निर्णय घेतलेला नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपने आज मुंबई रेल भरो आंदोलन सुरु केलं आहे.
चर्चगेट, चर्नी रोड आणि कांदिवली रेल्वे स्थानकात शेकडो भाजप कार्यकर्ते जमले. यावेळी आंदोलकांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रेलभरो आंदोलन केलं. बस आणि विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येते. मग रेल्वेतून प्रवास का करू दिला जात नाही?, सर्वसामान्यांनी काय घोडं मारलं? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.दरम्यान, विनातिकीट प्रवास केल्याप्रकरणी दरेकर यांना रेल्वेकडून 260 रुपयांचा दंड आकारण्यात आला.
भाजपचे नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात ही आंदोलने करण्यात आली. यावेळी आमदार मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते. तर आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले आमदार राहुल नार्वेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर, कांदिवलीत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेकडो भाजप कार्यकर्ते जमले होते. यावेळी आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. सर्व सामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सत्ता नाही म्हणून असंतोष निर्माण करू नका; हवं तर मराठा आरक्षणाचे श्रेय देखील घ्या पण…’
- राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातील समाधीस्थळ सुशोभीकरणासाठी अखेर निधी उपलब्ध !
- मोठी बातमी : ‘या’ तारखेपासून राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा विचार – उदय सामंत
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचे उल्लंघन करू नका – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
