Share

‘नशाबंदी मंडळाचे ५४ लाखांचे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘नशाबंदी मंडळ ही शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यरत असलेली एकमेव अनुदानित संस्था आहे. राज्यातील भावी पिढी व्यसनाधीन होऊ नये यासाठी पूर्णवेळ कार्यरत असलेल्या या मंडळाचे २०१८ पासूनचे ५४ लाख १५ हजार अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावे, याचबरोबर काळाची गरज ओळखून नशाबंदी संदर्भात मोठ्या प्रमाणात तरूणांचे प्रबोधन अत्यावश्यक असून त्याद्वारे महाराष्ट्राची प्रगती साध्य करता येणार आहे. नशाबंदी मंडळाचे काम आणि राज्याची व्याप्ती पाहता दरवर्षी वितरित होणाऱ्या अनुदानात वाढ करून ती 30 लाखावरून 60 लाख इतकी करण्याच्या कार्यवाहीस गती द्या.’ असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

मंत्रालयात नशाबंदी मंडळ या संस्थेच्या अनुदान व कामकाजासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, नशाबंदी हा संवेदनशील विषय असून, याबाबत तरुणांमध्ये जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षातील एकूण देय अनुदानापैकी १४.८५ हजार इतके अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहिम आणि व्यसनाधिन व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी स्वयंसेवी संघटनांना तीन कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

व्यसनमुक्ती धोरणाअंतर्गत प्रत्येक महसुली विभागास दोन याप्रमाणे व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या १२ संस्थांना प्रत्येकी ११ लाख अशी एकूण एक कोटी ३२ लाख याचबरोबर राष्ट्रीय महात्मा गांधी पुरस्कार व सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तीन कोटी रक्कम वितरीत करण्यात येत असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!