Share

आज नुसता नारळ फोडलेला नसून कामही सुरू झालंय; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दक्षिण मुंबईतील गजबजलेला भाग असलेल्या वरळीच्या बीडीडी चाळींचा लवकरच कायापालट होणार आहे. 10 बाय 10 च्या खोल्या असलेल्या वरळीकरांना लवकरच आलिशान फ्लॅट मिळणार आहे. वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून इमारतींचं बांधकाम होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडलाय.

यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यातील इतर मंत्री देखील उपस्थित होते. हा क्षण केवळ मुंबईसाठीच नव्हे तर देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याची भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच, आज नुसता नारळ फोडलेला नसून कामही सुरू झालंय असा टोला देखील त्यांनी फडणवीस सरकारला लगावला आहे.

‘हा क्षण मुंबईसाठी नाही तर देशासाठी महत्वाचा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये नवी दिशा दाखवण्याचं काम सुरू आहे. अडखळलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे काम आता हाती घेतले आहेत. बीडीडीच्या सर्व प्रकल्पाचा विकास होत असताना ३ वर्ष नारळ फुटुनही काही काम होतं नव्हतं. उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन बैठका घेऊन कोरोना काळात हा प्रोजेक्ट किती महत्वाचा आहे, त्याचं महत्व पटवून दिलं. आजचा नारळ नुसता फोडलेला नसून त्याबरोबरच काम सुरू केलेलं आहे,’ असं सांगतानाच प्रत्येक महिन्याला मी आणि मंत्री जितेंद्र आव्हाड या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी करणार आहोत, असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!