Share

राज्यात प्लास्टिकवर बंदी, वापर अथवा विक्री केल्यास होणार दंडात्मक कारवाई

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्लास्टिक बंदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. त्याची अखेर आज घोषणा करण्यात आली. प्लास्टिक बंदीबाबतच्या विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना रामदास कदम यांनी ही घोषणा केली. टप्प्याटप्प्याने राजभरात प्लास्टिक बंदी करण्यात येईल. त्यामुळे यापुढे प्लास्टिक विक्री करणाऱ्यावर आणि वापरणाऱ्यावर अशा दोघांवरही दंडात्मक कारवाईची तरतूद असेल.

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती आणि एम्पॉवर्ड समितीची स्थापना करण्यात येणार आहे. तसंच राज्यात यापुढे प्लास्टिक विक्री करणे आणि वापरणे गुन्हा ठरणार असून त्यासाठी दंड आकारण्यात येणार आहे, असं रामदास कदम यांनी सांगितलं. दरम्यान, पाण्याच्या बाटल्यांवर तूर्तास बंदी घालण्यात आलेली नाही. पण मिनरल वॉटर कंपन्यांच्या लॉबीचा सरकारवर दबाव असल्याने तूर्तास पीईटी (PET) बॉटल्सवरचा बंदीचा निर्णय पुढे ढकलल्याचं सांगण्यात येतं.

प्लास्टिक जाळले तरी नष्ट होत नसते. परिणामी पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही आणि नाल्यांमध्ये पाणी तुंबते. त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू वापरल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो. शिवाय प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!