Share

तर असे काम करणे कठीण… महिलेसोबत उद्धट वक्तव्य केल्याच्या आरोपावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : भास्कर जाधवांनी महिलेसोबत केलेल्या उद्धट वक्तव्यानंतर विरोधक तसेच नेटकरी देखोल संताप व्यक्त करत आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी यावरून भास्कर जाधव आणि ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यावर आता भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. या घटने नंतर पहिल्यांदाच ते व्यक्त झाले आहे.

‘मला यावर काहीच बोलायचं नाही. लोकांना मदत करणं हाच माझा प्राथमिक हेतू आहे. कालही मला लोकांना मदत करायची होती. ती महिला माझ्या मुलीसारखी होती. तिच्यासोबत किंवा माझ्या नातू किंवा भाचासारख्या असणाऱ्या मुलासोबतही मी बोलायचं नाही आणि तेसुद्धा कोणत्यातरी चॅनेलच्या प्रतिनिधीला विचारुन बोलायचं असेल तर काम करणं कठीण आहे. पण ज्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरच सोशल मीडियावर लोक तुटून पडले आहेत’ असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

तसेच, ‘पाहणी करणं हा विषय संपला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत: चिखलात पायी फिरत पाहणी केली आहे. त्यांच्या आदेशानुसार तत्काळ साफसफाई करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे. त्यासाठी आपल्या मतदारसंघातून ४०० ते ५०० माणसं साहित्य घेऊन येथे पोहोचली आहे. तसंच नानासाहेब धर्माधिकारी यांच्या संस्थेकडून माणसं आली आहेत. याशिवाय डंपर वैगेरे मागवून शहर साफ कऱण्याचं काम सुरु आहे,’ अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!