🕒 1 min read
मुंबई : मे महिन्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे बीसीसीआयने तातडीची बैठक बोलावून स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा केली. यानंतर उर्वरीत आयपीएल स्पर्धेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहीले. यावर बीसीसीआयने काही दिवसातच आढावा बैठक बोलावून आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने युएईत होणार असल्याची घोषणा केली.
मात्र अद्यापही स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र बीसीसीआयने २५ जुलै रोजी ट्विट करत आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरीत सामन्याच्या वेळापत्रकाची घोषणा केली. युएई येथे १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोंबर दरम्यान ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन कट्टर प्रतिद्वंदी संघादरम्यान होणार आहे.
????️ The dates are OUT!
Get ready for the #VIVOIPL extravaganza in the UAE ????????
FULL SCHEDULE ???? pic.twitter.com/8yUov0CURb
— IndianPremierLeague (@IPL) July 25, 2021
आयपीएल २०२१च्या उर्वरीत हंगामातील पहिला क्वालीफायर सामना १० ऑक्टोबर रोजी तर इलिमीनेटर ११ ऑक्टोबर रोजी आणि दुसरा क्वालीफायर सामना १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना हा १५ ऑक्टोबर रोजी आयोजीत करण्यात आला आहे. स्पर्धेचे सर्व सामने शारजाह, अबुधाबी आणि दुबई येथे आयोजीत करण्यात आले आहे. यापुर्वी २०२०मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे युएई येथे आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- भुवीच्या घातक गोलंदाजीमुळे भारताचा श्रीलंकेवर पहिल्या टी-२०त ३८ धावांनी विजय
- राज्यात आज १२३ रुग्णांचा मृत्यू कोरोनाबाधित ; वाचा आजची आकडेवारी
- तळिये, चिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर ; केला कोकणचा दौरा
- ‘उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे! ते मुख्यमंत्री झाल्यापासून कोरोना आला, वादळं आली’
- अन् अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहून खा. नवनीत राणांना अश्रू अनावर, पाहा हा व्हिडिओ..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

