Share

अकरावी प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक, हँग वेबसाइटमुळे विद्यार्थी-पालक संभ्रमात!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र मूल्यांकनानुसार दहावीचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा मात्र बंधनकारक करण्यात आली आहे. सीईटीचे अर्ज भरण्यासाठीची वेबसाईट बुधवारी हँग झाली होती. त्यामुळे मंडळाने तूर्तास नोंदणीची प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हटल्यामुळे पालक आणि विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत.

राज्य सरकारने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक केली आहे. विद्यार्थ्यांनी सीईटीचे अर्ज भरण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र वेबसाईट हँग झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरता हिरमोड झालेला आहे. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन करून गुण देण्यात आले आहे. मात्र या मूल्यमापनावर राज्यभरातून टीका झाली होती. त्यामुळे शिक्षण विभागाने अकरावी वर्गात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ च्या दरम्यान अकरावी सीईटी परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे.

या सीईटीचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी संगणक केंद्रावर गर्दी केली आहे. मात्र, सीईटीचे अर्ज भरण्याची वेबसाइट हँग झाल्यामुळे विद्यार्थ्यांना बुधवारी दिवसभर अर्ज भरता आलेले नाही. या वेबसाईटवर तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ तात्पुरत्या वेळेसाठी बंद करण्यात आले आहे, असा मेसेज दिसत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये दिवसभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यासंदर्भात औरंगाबाद शिक्षण संचालक विभागाशी संपर्क साधून वेबसाईट बंद का पडली? असे विचराले असता त्यांनी राज्य मंडळाकडे याची जबाबदारी असल्याचे सांगितले आहे. या वेबसाईटची तांञिक अडचण आहे. ही समस्या राज्य मंडळच निस्तारेल असे, औरंगाबाद शिक्षण संचालक विभागाने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!