बीड : गेल्या आठवड्यात मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा मंत्रीमंडळ विस्तार नुकताच पार पडला. यात महाराष्ट्रातील ४ नेत्यांना स्थान मिळालं. यात खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती मात्र त्यांच्या जागी भागवत कराड यांना स्थान मिळालं. यानंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली. यानंतर बीड, नगरमध्ये पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली.
त्यानंतर नुकतेच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधत सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं होतं. तसंच, ‘आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू,’ असं सूचक वक्तव्य मुंडेंनी केलं होतं. तर, खुलासा करूनही पंकजा या राज्यातील नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या शिवसेनेत जाण्याची कुजबुज देखील सुरु होती.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा असून त्या शिवसेनेत आल्या तर स्वागतच असं विधान शिवसेना नेते आणि राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे. ‘पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्या आहेत. त्यांच्याकडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे. त्यामुळे त्या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल. तसेच त्यांचा योग्य तो मानसन्मानही आमच्या नेत्यांकडून केला जाईल,’ असं भाष्य शंभूराज देसाई यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पवारांच्या आशीर्वादाने ठाकरे मुख्यमंत्रीपदी, मग राष्ट्रवादी कोणामुळे सत्तेत ?’; शिवसेनेचा राष्ट्रवादीला सवाल
- योगी महाराजांनी ‘तो’ कायदा लावलाच तर भाजपचे १६० आमदार बाद होतील; संजय राऊतांचा खोचक टोला
- शाब्बास ! ‘या’ कारणासाठी दहा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास; उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
- सावधान! श्रीलंकेचे ‘हे’ खेळाडू करु शकतात धवनसेनेचे दहन
- काळरात्र : चेंबूरमध्ये पावसाचं रौद्ररूप; घरांवर संरक्षक भिंत कोसळून १४ जणांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
