Share

पुणेकरांना किंचित दिलासा : कोरोनामुक्तांचा आकडा वाढला, तर नव्या कोरोना बाधितांची संख्या…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहराच्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत होती. तर, कोरोनामुक्तांची संख्या ही नव्या बाधितांच्या तुलनेत कमी असल्याने सक्रिय रुग्णांमध्ये देखील वाढ होत होती. मात्र, आज कोरोनामुक्ताच्या संख्येत वाढ झाली आहे. तर, आज नव्या कोरोना रुग्णांची संख्या देखील तीनशे पारच आहे. त्यामुळे पुण्यावरील कोरोना संकट हे अजूनही कायम आहे.

आज (दि. १७ जुलै) रोजी पुणे शहरात तब्बल ३२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८३ हजार ५२० इतकी झाली आहे. शहरातील ४३२ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७१ हजार ९०९ झाली आहे.

तर, पुणे शहरात सध्या २ हजार ९२६ ऍक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण आहेत. त्यापैकी २३४ रुग्ण गंभीर तर ४८९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोना स्थिती पूर्ण आटोक्यात येण्यासाठी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!