🕒 1 min read
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक २०२२ च्या सुरुवातीला होणे अपेक्षित आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता कामाला लागल्याचे दिसून येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पुणे महापालिका इमारतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आगामी महापालिका निवडणुकांसोबतच महापालिकेच्या विभाजनाचा मुद्दा देखील मांडला आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आहेत. २३ गावांच्या समावेशामुळे पुणे महापालिका हि राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरली आहे. वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढणारा ताण लक्षात घेता आता पुणे जिल्ह्यात तिसऱ्या महापालिकेची गरज भासू लागली असून पुणे महापालिकेचे विभाजन करून नवी महापालिका निर्माण करावी अशी मागणी केली जात आहे. रामदास आठवले यांनी देखील या मागणीचे समर्थन केले आहे.
रामदास आठवले म्हणाले, पुण्याचा विस्तार होत असून ४० लाखाच्या पुढे लोकसंख्या गेली आहे. त्यामुळे महापालिकेचे विभाजन करून दोन महापालिका अस्तित्वात यायला हव्यात, अशी मागणी करतानाच पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करेन असं आश्वासन देखील आठवलेंनी दिलं आहे.
यासोबतच, ‘रिपब्लिकन पक्षाचे आता पालिकेत पाच नगरसेवक आहेत. तीन उपमहापौर झाले आहेत. स्वबळावर निवडणूक लढून हे यश मिळवणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही भविष्यातही भाजपसोबतच राहणार असून, नगरसेवकांची संख्या वाढवणार आहोत. विधानसभेलाही आम्हाला भाजपच्या साथीने चांगल्या जागा मिळतील,’ असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब..’ अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा
- ‘कोणी कितीही आरोप करा, माझ्यावर ईडीची कारवाई होणार नाही!’ अनिल परब यांचा दावा
- मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर हालचालींना वेग, सफारी पार्कसाठी मिळणार अतिरिक्त १२५ एकर जमीन!
- ‘कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना प्रत्येकी ५ लाखांची मदत करा’, मुख्यमंत्र्यांना १४०० इमेल्स
- केदार शिंदेने सुरेखा सीकरी यांना ट्विट करत वाहिली श्रद्धांजली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

