🕒 1 min read
बीड : एमपीएससी मार्फत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक २०१७ पदाची पूर्व आणि मुख्य परिक्षा पास होऊन देखील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र मिळालेले नाहीत. याची दखल घेत आमदार विनायक मेटे यांनी या पास झालेल्या उमेदवारांसह परिवहन मंत्र्यांची भेट घेत ६१ मुलींच्या निवडीचा विषय मार्गी लावला.
२३ डिसेंबर २०१६ ला प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचने नुसार मोटार वाहन विभागातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाकरीता अवजड वाहन परवाना व सरकारी गॅरेजमधील १ वर्षाचा अनुभव परिविक्षाधीन कालावधीत पूर्ण करता येईल. या अर्हता नमूद करण्यात आल्या होत्या.
त्यानुसार ८३३ विदयार्थ्यांची निवड करण्यात आली. याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने मोटार वाहन विभागातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाकरीता अवजड वाहन परवाना व सरकारी गॅरेजमधील १ वर्षाचा अनुभव उमेदवाराची परिविक्षाधीन कालावधी पूर्ण होण्याआधी असायला हवे असे नमूद करीत २३ डिसेंबर २०१६ रोजीची अधिसूचना अमान्य केली होती.
राज्य सरकारने योग्य बाजू न मांडल्याने व या युवक-युवतींच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे राज्य सरकारने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही पदभरती उच्चन्यायालयाकडून रद्द करण्यात आली होती. आ मेटे यांनी गुरुवारी ६१ मुलींच्या निवडी संदर्भात रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री अनिल परबांशी चर्चा केली. आयोगाचा सल्ला घेऊन कार्यवाही करू असे बैठकीत निश्चित करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; नितीन राऊतांची पटोलेंविरुद्ध सोनियांकडे तक्रार
- नितीन गडकरींच्या खासदारकीवर पटोलेंचा आक्षेप, याचिकेवर ६ ऑगस्टपासून सुनावणी
- ‘मागण्या मान्य होत नसतील तर राज्यात पुन्हा आंदोलन सुरू करणार’, संभाजीराजेंचा इशारा
- सामना गमावला तरीही चर्चा भारताच्या ‘सुपरवुमन’ हरलीनची
- संजय राठोड लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार ? शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
