🕒 1 min read
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात 43 नव्या मंत्र्यांचा समावेश केला. हा समावेश करताना जुन्या 12 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. नव्या चेहऱ्यांसह मोदी पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. या बदलाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी केंद्राने सहकार मंत्रालय स्थापन केले असून या मंत्रालयाचा कारभार आता गृहमंत्री अमित शाह सांभाळणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते आज पुण्यामध्ये पत्रकारांशी सवांद साधत होते. यावेळी ते म्हणाले कि, ‘केंद्रातील मोदी सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. मात्र त्यांना सहकाराची एबीसीडी माहिती नाही. कदाचित सहकार क्षेत्राची व्यवस्था उध्वस्त करायची म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. आधीपासूनच ते देशातील अनेक व्यवस्था ते उध्वस्त करत आहेतच. आणि मोदी सरकारने जर देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार?’ असे ते यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान हे खाते निर्माण करण्यामागे शेतकऱ्यांचे कल्याण हा मुद्दा असला तरीही राजकीय विचार करून देखील हे खाते निर्माण करण्यात आल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या तीन प्रमुख राज्यांमध्ये सहकारी चळवळींचा फार मोठा राजकीय प्रभाव आहे. या तीनपैकी केवळ महाराष्ट्रात भाजपाची सत्ता नाही. भाजपासाठी ही तिन्ही राज्ये फार महत्वाची असल्याने या नवीन खात्याच्या माध्यमातून सध्या सत्ता नसणाऱ्या महाराष्ट्रावरील राजकीय पकड अप्रत्यक्षपणे अधिक घट्ट करण्याचा भाजपाचा प्रयत्न राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याचा निर्धार; रिपब्लिकन पक्षाची जय्यत तयारी
- खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- नाथा भाऊंच्या पाठोपाठ मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबाचा पाय आणखी खोलात
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
