श्रीलंका : गेल्या काही दिवसापासुन श्रीलंका क्रिकेट या ना त्या कारणाने सतत चर्चेत आहे. काही दिवसापुर्वी श्रीलंका संघातील खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांचा वाद चव्हाट्यावर आला होता. भारत विरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रीलंका क्रिकेटमधून पाच खेळाडूंनी भारताविरुद्धच्या मालिकेसाठी असलेल्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यानंतर हे खेळाडू कॅम्प देखील सोडून गेले असल्याचे समजले.
यानंतर आता श्रीलंकेचा कॅप्टन कुशल परेराची हकालपट्टी होणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ऑल राऊंडर दासून शनाकाला या सीरिजसाठी कॅप्टन करण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डानं घेतला आहे. शनाका हा नव्या करारपद्धतीवर स्वाक्षरी करणारा पहिला खेळाडू होता. गेल्या चार वर्षातील श्रीलंकेचा दासून शनाकाला हा सहावा कॅप्टन असेल. यापूर्वी दिनेश चंदिमल, अँजलो मॅथ्यूज, लसिथ मलिंगा, दिमूथ करुणारत्ने आणि कुशल परेरा यांनी श्रीलंकेचं नेतृत्तव केलं आहे.
दरम्यान, शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला असून २९ जून ते १ जुलै पर्यंतचा आपला क्वारंटाईन कालावधीत पूर्ण करून सर्व खेळाडू आता एकत्र आले आहेत. ५ जुलैपासून भारतीय संघाने एकत्र सराव करण्यास सुरुवात केली. भारताचे खेळाडू श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर त्यांना पुढील तीन दिवस क्वारंटाईन राहावे लागले होते. परंतु, आता त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला असून भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल ९ तास कसून चौकशी; वकिलांनी दिली महत्वाची माहिती
- ‘कामाला लागा’; उद्धव ठाकरेंचे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना आदेश !
- एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल ९ तास कसून चौकशी; वकिलांनी दिली महत्वाची माहिती
- अन् संजय राऊत म्हणाले ‘…तर निवडणुकीसाठी मी पुन्हा येईन!’
- रोजगाराची मोठी संधी : राज्यातील सुमारे ६ हजारहून अधिक शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदिल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
