Share

‘हे सरकार आपल्या कार्यक्षमतेवर फक्त बहाण्यांचे पांघरूण घालण्यात हुशार’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार अकार्यक्षम असल्याचा आरोप भाजपच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. त्यात मग कधी मुख्यमंत्र्यांवर तर कधी वेग-वेगळ्या मत्र्यांवर टीका होत आहे. अशीच टिका भाजप नेते अतुल भातखळर यांनी केली आहे. ठाण्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्थानकांसंर्भात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.

या संदर्भात भातखळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘ठाण्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी १०० चार्जिंग स्थानके अडीच वर्षात उभी राहणार होती. मात्र आज ४ वर्षांनीदेखील निव्वळ जागा उपलब्ध नसल्याने एकही स्थानक सुरू होऊ शकलेले नाही. हे सरकार आपल्या कार्यक्षमतेवर फक्त बहाण्यांचे पांघरूण घालण्यात हुशार आहे.’

ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे अनेक विकास कामांना खिळ बसली आहे. त्यात ठाकरे सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात कमी पडली असा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यात इतरही पायाभुत सुविधांची कामे ठप्प झाली आहेत. राज्य सरकार मात्र, केवळ केंद्राकडे बोट दाखवत असल्याचा आरोपही भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!