🕒 1 min read
औरंगाबाद : शहरातील पार्किंगचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. आगामी काळात नो व्हेकल रोड म्हणून विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र यासाठी सर्वप्रथम पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे त्यामुळे पैठणगेट येथील खुल्या जागेत पाच मजली मल्टी स्टोरेज पार्किंग बांधण्यासाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले
वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे गुलमंडी, रंगारगल्ली, कुंभारवाडा, पैठणगेट, सराफा बाजार याठिकाणी पायी चालणे देखील अवघड होऊन बसले आहे. त्यातल्यात्यात अतिक्रमणधारक हात गाड्यांच्या विळख्यामुळे दुचाकी-चारचाकी धारकांना वाट काढणे अवघड झाले आहे. रस्ता नावालाच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील या चार प्रमुख रस्त्यांचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता.
आता पैठण गेट ते गुलमंडी नो व्हेईकल रस्ता असेल. त्यामुळे चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था महापालिकेला करावी लागणार आहे. प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी पैठण गेट येथील मोकळ्या जागेवर पाच मजली इमारती उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी किमान पाचशे कार पार्क करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. पैठणगेट गुलमंडी रस्त्यावर ग्राहक पायी खरेदी करतील अशी संकल्पना आहे. त्यानुसार पीएमसी ची नियुक्ती करण्यास आता निविदा काढण्यात आली आहे पीएमसीची निविदा काढण्यात आली आहे. पीएमसीची नियुक्ती झाल्यानंतर झाल्यानंतर डीपीआर तयार केला जाईल असे पानझडे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री केले होते’, दरेकरांचा राऊतांना टोला
- कोण रुपाली चाकणकर ? मी त्यांना ओळखत नाही, नवनीत राणांचा टोला
- ‘माझा होशील ना’ मालिकेत होणार आदित्यबद्दल मोठा खुलासा
- श्रीलंकेच्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट आला समोर ; ‘एवढे’ दिवस रहावे लागणार विलगिकरणात
- मंत्रिपद नाकारल्याने मुंडे भगिनी नाराज? ‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर भाजपने दिले स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
