🕒 1 min read
मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. याद रख सिंकदर के हौसले तो आली थे…जब गया था दुनिया से दोनो हात खाली थे…अशा शब्दात भाजप सरकारला धनंजय मुंडेनी सुनावले.
धनंजय मुंडे म्हणाले, भाजपची अवस्था सिंकदर प्रमाणे झाली आहे. तो जग जिंकत गेला.पण त्याने एक चुक केली.जिंकलेले राज्य सांभाळण्याची व्यवस्था केली नाही. त्याप्रमाणेच भाजप आज एक एक राज्य जिंकत तर आहे, पण राज्य कसे चालवावे? हे त्यांना कळत नाही. म्हणूनच एक दिवस सिंकदर प्रमाणे भाजपला मोकळ्या हाताने जावे लागेल.
सरकारने केलेल्या कर्जमाफी संदर्भात बोलतांना मुंडे म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत. आमचा बाप आत्महत्या करताना आम्ही पाहू शकत नाही. कर्जमाफी झालेला एकही शेतकरी सापडत नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळीची जाहीर झालेली मदत तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा कोणताही प्रश्न मोठा नाही. त्यामुळे आपण अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करावी, अशी मागणी धनंजय मुंडेनी सभागृहात केली.
आम्ही शेतक-याची पोर आहोत, आमचा बाप आत्महत्या करतांना आम्ही पाहू शकत नाही. कर्जमाफी झालेला एकही शेतकरी सापडत नाही, बोन्डअळीची जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे , त्यामुळे शेतक-यांच्या या प्रश्नापेक्षा कोणताही विषय मोठा विषय नाही त्यावर तातडीने चर्चा करावी अशी मागणी आज अधिवेशनात केली.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 6, 2018
भाजपची अवस्था सिंकदर प्रमाणे झाली आहे.
तो जग जिंकत गेला.पण त्याने एक चुक केली.जिंकलेले राज्य सांभाळण्याची व्यवस्था केली नाही. त्याप्रमाणेच भाजप आज एक एक राज्य जिंकत तर आहे, पण राज्य कसे चालवावे? हे त्यांना कळत नाही. म्हणूनच एक दिवस सिंकदर प्रमाणे मोकळ्या हाताने भाजपला जावे लागेल. pic.twitter.com/Snaensti2S— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 6, 2018
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
