इंग्लंड : इंग्लंड दौऱ्यावरील डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यानंतर भारतीय संघ 20 दिवसाच्या सुटीवर आहे. ही सुटी संपल्यानंतर भारतीय संघ हा इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेपुर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गील जायबंदी झाला आहे.
शुभमन गील जायबंदी झाल्यामुळे त्याच्या जागी रोहित शर्माच्या जोडीला कोणत्या खेळाडूची वर्णी लागते याची उत्सुकता क्रिकेट रसिंकाना लागली आहे. गिलला दुखापत झाल्यामुळे ओपनर म्हणून कोणाला खेळवायचं, याबाबतचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंट करत आहे. शुभमन गिलच्या जागी केएल राहुल आणि मयंक अग्रवाल असे दोन पर्याय आहेत. यावरूनच भारताचा माजी ओपनर वसीम जाफर याने विराट कोहलीला सल्ला दिला आहे. मयंक अग्रवालला ओपनर म्हणून संधी दिली पाहिजे, असं मत जाफरने मांडलं आहे. केएल राहुल आयपीएलमध्ये ज्या पंजाब किंग्सचा कर्णधार आहे, त्याच टीममध्ये वसीम जाफर बॅटिंग प्रशिक्षक आहे.
आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना तो म्हणाला, शुभमन गीलच्या दुखापतीमुळे मयंक अग्रवाल आणि लोकेश राहुल साठी खेळण्याची ही चांगली संधी आहे. पण शुभमन गीलच्या जागी मयंक अग्रवालला प्राथमिकता दिली पाहिजे, मागील काही वर्षातील त्याची कामगिरी शानदार आहे. तसेच राहुलला कसोटीत नव्या चेंडूविरुद्ध खेळताना अडचणी येत असल्याचे मागील वर्षी दिसून आले. तो मधल्या फळीत चांगली फलंदाजी करू शकतो.’ असं जाफर म्हणाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पैठणच्या एकनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान, पादुका १८ दिवस नाथमंदिरात मुक्कामी
- स्वच्छता प्रिमियर लीगचे थेट लाईव्ह प्रक्षेपण खास औरंगाबादकरांसाठी! ८० कर्मचाऱ्यांचा सत्कार
- ‘अमित शाह यांच्या मुलाची संपत्ती देखील भरमसाठ वाढलीये’; ईडी कारवाईवरून नाना पटोलेंचा टोला
- जो समाज मागासलेलाच नाही त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही – गुणरत्न सदावर्ते
- ‘भाजप राज्यपालांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण करतं; आम्ही त्याला भीक घालत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

