🕒 1 min read
श्रीलंका : शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल. भारताचे प्रमुख खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये असल्याने या दौऱ्यासाठी नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला असून २९ जून ते १ जुलै पर्यंतचा आपला क्वारंटाईन कालावधीत पूर्ण करून सर्व खेळाडू आता एकत्र आले आहेत. २ ते ४ जुलै या कालावधीत त्यांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ५ जुलैपासून हा संघ एकत्र सराव करण्यास सुरुवात करतील, अशी माहिती श्रीलंका क्रिकेटच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
???????? Snapshots from #TeamIndia's first training session in Sri Lanka ????????#SLvIND pic.twitter.com/hzBx8DNye2
— BCCI (@BCCI) July 2, 2021
भारतीय संघाचे श्रीलंकेतील पहिले सराव सत्र शुक्रवारी पार पडले. भारताचे खेळाडू सोमवारी श्रीलंकेत दाखल झाले होते. दाखल झाल्यानंतर त्यांना पुढील तीन दिवस क्वारंटाईन राहावे लागले होते. परंतु, आता त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला असून भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे. सरावाचे काही फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटरवर शेअर केले आहेत. तसेच क्वारंटाईन संपला असून टीम इंडियाने सरावला सुरुवात केली आहे असे कॅपशन देखील दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पैठणच्या एकनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान, पादुका १८ दिवस नाथमंदिरात मुक्कामी
- स्वच्छता प्रिमियर लीगचे थेट लाईव्ह प्रक्षेपण खास औरंगाबादकरांसाठी! ८० कर्मचाऱ्यांचा सत्कार
- ‘अमित शाह यांच्या मुलाची संपत्ती देखील भरमसाठ वाढलीये’; ईडी कारवाईवरून नाना पटोलेंचा टोला
- जो समाज मागासलेलाच नाही त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही – गुणरत्न सदावर्ते
- ‘भाजप राज्यपालांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण करतं; आम्ही त्याला भीक घालत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

