Share

स्वच्छता प्रिमियर लीगचे थेट लाईव्ह प्रक्षेपण खास औरंगाबादकरांसाठी! ८० कर्मचाऱ्यांचा सत्कार

Published On: 

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छते संदर्भात आयोजित केलेल्या प्रीमियर लिग २०२१ या स्पर्धेत निवड झालेल्या ८० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२) पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण स्मार्ट सिटीद्वारे बसविण्यात आलेल्या डिजिटल आऊटडोअर डिस्प्ले स्क्रीनस् वर दाखविण्यात आले. हा पहिला कार्यक्रम होता ज्याचे थेट प्रक्षेपण डिजिटल आऊटडोअर डिस्प्ले स्क्रीनसवर दाखवण्यात आले.

महानगरपालिकेच्या टीव्ही सेंटर येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात स्वच्छता प्रीमियर लिग २०२१ स्पर्धेत निवड झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक असदुल्ला खान, स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ, अनिल जाधव, उमाकांत गोदे यांच्यासह ९ स्वच्छता निरीक्षकांचा तसेच स्वच्छता जवान, ३४ स्वच्छता कर्मचारी, सफाई कामगार, ९ वाहन चालक, ९ रेड्डी सुपरवायझर आदी ८० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पाण्डेय यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, स्मार्ट सिटी चे आदित्य तिवारी, गौरी मिराशे, अर्पिता शरद आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन विशाल खरात, आनंद तांबे, प्रतीक साळवे, काशीफा खान, जावेद खान, निखिल जोगदंड आदींनी केले होते. यावेळी प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी कोविड काळात केलेल्या कार्याबद्दल स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘कोरोनीमुळे या कार्यक्रमाच्या आयोजनाला उशिर झाला. कोविडमुळे कमी संख्येमध्ये हा स्वच्छता प्रिमियर लीग आयोजित करण्यात आला आहे ‘.

प्रशासक पाण्डेय म्हणाले की, अजूनही शहरात पुष्कळ ठिकाणी रस्त्याचा कडेला कचऱ्याचे ढीग सापडतात. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नागरिकांसोबत संवाद साधून त्यांना घरगुती कचऱ्याला वेगवेगळा करून घंटा गाडीला देण्यासाठी प्रेरित करावे. आणि जे नागरिक बेजबाबदार वागतात त्यांना नोटीस आणि दंड लावा. कारण शहराला अस्वच्छ करण्याचा अधिकार कोणाला नाही. असे सांगून प्रशासक पाण्डेय म्हणाले की, जर शहर देशात १० स्वच्छ शहरांमध्ये आले तर जास्तीजास्त लोकांना पुरस्कार दिले जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!