Share

‘तीन खासदार अन् साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असणाऱ्या ‘भावी’ पंतप्रधानांना शुभेच्छा!’

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,’ अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली आहे. ते बुधवारी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘तीन खासदार अन साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असणाऱ्या ‘भावी’ पंतप्रधान शरद पवार यांना पुढील तीस वर्षांच्या ‘भावी’ पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत’ अशी कोपरखळी त्यांनी मारली.

ओबीसींच्या संदर्भात इम्पिरिकल डाटा सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलं होतं, मात्र राज्य सरकारनं ते केलं नाही, असा आरोपही त्यांनी केला. ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली, असंही ते म्हणाले. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असंही ते म्हणाले.

दिल्लीत शरद पवार यांच्या पुढाकारानं झालेल्या राष्ट्र मंचाच्या बैठकीची पडळकरांनी खिल्ली उडवली. ‘तिसऱ्या आघाडीसाठी झालेली बैठक म्हणजे ‘रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात’ अशातला प्रकार आहे. मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, असा चिमटाही पडळकर यांनी पवारांना काढला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!