Share

यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध कायम ! वाचा राज्य सरकारची नियमावली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यासह देशातील दुसऱ्या लाटेचा धोका ओसरत असून कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट आणि संभाव्य तिसरी लाट यांचा धोका कायम आहे. तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार तिसऱ्या लाटेत रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्णसंख्या नोंदवली जाईल. त्यामुळेच, आषाढी वारी, गणेशोत्सव यासह येणाऱ्या सर्व धर्मिय सण-उत्सवांवर निर्बंध कायम राहतील. दरम्यान, आज राज्य सरकारने गणेशोत्सवावरील निर्बंध जाहीर केले आहेत.

मागील वर्षी सरकारने नियमावली उशिरा जाहीर केल्याने मूर्तिकारांसह गणेशोत्सवावर अवलंबून असलेल्या इतर व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यंदा नियमावली लवकर जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आज नियमावली जाहीर करण्यात आली असून मूर्तीच्या उंचीपासून ते उत्सवाच्या पद्धतीपर्यंत सर्व निर्बंध उत्सवाच्या सुमारे अडीच महिने आधीच जाहीर करण्यात आले आहेत.

अशी आहे गणेशोत्सवाची नियमावली –

  • गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित, शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी. कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी, सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत
  • आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी. गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
  • श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळासाठी 4 फूट आणि घरगुती गणपतीसाठी 2 फुटांच्या मर्यादेत असावी.
  • यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर अशा मूर्तीचं पूजन करावं. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावं. विसर्जन घरी करणं शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावं.
  • गणेशोत्सवात देणगी अथवा वर्गणी स्वईच्छेने कोणी देत असेल तरच त्याचा स्वीकार करावा. तसेच गणेशोत्सवात जाहिरातींमुळे नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर इतर जाहिरातींपेक्षा आरोग्यविषयक जाहिरातींना प्राधान्य देण्यात यावं
  • विविध सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरासारखे आरोग्यपूरक उपक्रम राबवण्यावर भर दिलं जावं. तसेच यामाध्यामतून डेंग्यू, मलेरिया, कोरोना सारख्या आजारांची नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी.
  • राज्य सरकारकडून वेळोवेळी लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain चे नियम कायम राहतील. गणेशोत्सवा दरम्यान यामध्ये कोणतीही मोकळीक दिली जाणार नाही.
  • त्याचबरोबर आरती, भजन, किर्तन असा धार्मिक कार्यक्रमांत गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियम आणि तरतूदींचं काटेकोर पालन करण्यात यावं.
  • श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  • गणपती मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
  • प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
  • श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनास्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळींतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित रित्या काढण्यात येऊ नये.
  • महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!