मुंबई : कोरोना महामारीच्या काळात लस ही महत्त्वाची अस्त्र झाली आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. 21 जूनपासून देशातील प्रत्येकासाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. दरम्यान अनेक तज्ञ मंडळींकडून आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळेच लहान मुलांनाही लस मिळाली पाहिजे अशी मागणी सध्या पालकांकडून होत असल्याचे पाह्यला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि एका अमेरीकन औषध कंपनीने लहान मुलांना देण्यात येणारी ही लस बनवली आहे. हे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि अमेरिकन औषध कंपनी यांनी मिळून तयार केलेल्या नोवोव्हॅक्स या लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसीच्या चाचणीला लवकरच सुरुवात होणार आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ आणि केईएम रुग्णालयात लहान मुलांवर या लसीच्या चाचणीला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 12 ते 17 या वयोगटातील मुलांना ही लस देण्यात येणार असून त्यांच्यावरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर 2 ते 11 या वयोगटातील लहान मुलांवर या लसीची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वीच लहान मुलांची लस बाजारात उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान 21 जूनपासून देशातील प्रत्येकासाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. सध्या, सीरम इन्स्टिट्यूटचे कोवाशिल्ड फॉर कोरोना, भारत बायोटेकची कोवाक्सीन आणि रशियाची स्पुतनिक लस केवळ उपलब्ध आहे. परंतु पुढच्या महिन्यापासून जॉन्सन आणि जॉन्सनची कोरोना लस देशात उपलब्ध होऊ शकेल.यामुळे कोविड विरूद्ध लढा अधिक तीव्र होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ओबीसी असल्यानंच महसूल खातं मिळालं नाही’; वडेट्टीवारांनी जाहीरपणे बोलून दाखवली खंत
- ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारताची धावपटु हिमा दास दुखापतग्रस्त
- डब्ल्युटीसी गमावल्यानंतरही अमरनाथ यांच्याकडून विराटचे कौतुक
- ‘आठवणीतले दिवस’, फलंदाजीचा सराव करत असताना चाहरला आठवले शाळेतले दिवस!
- ‘फायनल हा एकच सामना असतो’ ; बेस्ट ऑफ थ्रीवरून कोहलीला सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
