Share

शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी घेतली मुख्य सचिव कुंटे यांची भेट

Published On: 

औरंंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेतली. यावेळी प्रधान सचिव आशिषकुमार सिंग आणि प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासमवेत सुद्धा बैठक घेतली.

या बैठकीत चाळीसगाव रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) दरम्यान औट्रम घाटातील बोगदा संदर्भात सकारात्मक चर्चा केली. तसेच संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या १ लाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना सुपूर्द करण्यात आले.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत, राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासोबत अ;ॅड.आशुतोष डंख, शिवसेना तालुका संघटक डॉ.अण्णासाहेब शिंदे, सरपंच अशोक दाबके यांची उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!