🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता.
तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो वा पुढील विधानसभा निवडणूका, काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरु केली आहे. स्वबळाच्या नाऱ्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्येच टोलेबाजी सुरु असून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पुन्हा भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे. यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेतील नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
महाविकास आघाडीतील धुसफुशीवर माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना खोचक टोला लगावला आहे. ‘या तिन पक्षांमध्ये नाराजी होऊच शकत नाही. कारण, एकदा सत्तेची चटक लागली की नाराजी दोन दिवसांपुरती उरते. 19 तारखेला काँग्रेस नेते राहुल गांधींचा वाढदिवस होता, त्या दिवशी केक खाऊ घालायचे, त्याच दिवशी जोडे खाऊ घालायची भाषा झाली. मी याकडे लक्ष देत नाही. या तीन पक्षांमध्ये कोण नाराज आहे याकडे आम्ही पाहत नाही तर जनता नाराज राहता कामा नये ही आमची भूमिका आहे,’ असं म्हणत मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- कार चालवण्याचा खर्च होणार कमी; सरकारचा मोठा दिलासा
- ‘तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचे हाल का?’; फडणवीस आक्रमक
- ‘पवारांच्या पे रोलवर राहून बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’
- पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू ‘या’ पक्षाचा असू शकतात मुख्यमंत्री पदाचा चेहरा
- ठाकरे सरकारचं ठरलं ! पावसाळी अधिवेशन दोन दिवसातच उरकणार


