🕒 1 min read
नवी दिल्ली: सध्या पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती प्रचंड वाढल्या आहे. यामुळे सामान्य माणसाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. कार चालवण्यासाठी अधिक खर्च होतो. मात्र आता तुमचा हा खर्च आता कमी होणार आहे. पर्यायी इंधन इथेनॉलच्या वापराने हे शक्य होणार आहे.
रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी पुढील जवळपास १० दिवसांत फ्लेक्स फ्यूल इंजिनबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. अशा प्रकारचं इंजिन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी अनिवार्य केलं जाईल. फ्लेक्स फ्यूल (Flexible Fuel) हे इंधन जे पेट्रोलच्या जागी इथेनॉलवरही चालवलं जाऊ शकतं. या पर्यायी इंधनाची किंमत ६० ते ६२ रुपये प्रति लीटर असेल, तर पेट्रोलची किंमत १०० रुपये प्रति लीटरहून अधिक आहे. यामुळे इथेनॉल इंधनावर कार चालवणं ४०%पर्यंत स्वस्त होऊ शकते.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, या इंडस्ट्रीसाठी एक आदेश जारी करणार आहे. आता केवळ पेट्रोल इंजिनच असणार नाही, तर Flex-Fuel Engines ही असतील. येत्या ८ ते १० दिवसांत फ्लेक्स फ्यूल इंजिन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
ब्राझिल, कॅनडा आणि अमेरिकेत ऑटोमोबाईल कंपन्या फ्लेक्स फ्यूल इंजिनचं प्रोडक्शन करत आहेत. या देशात ग्राहकांना १०० % पेट्रोल किंवा १०० % इथेनॉलचा पर्याय देण्यात येत आहे. सध्या प्रति लीटर पेट्रोलमध्ये ८.५ % इथेनॉल ब्लेंडिंगची मंजुरी आहे. २०१४ मध्ये हे प्रमाण १ ते १.५ टक्के होतं. इथेनॉलची खरेदीही ३८ कोटी लीटरवरुन ३२० कोटी लीटरपर्यंत पोहचली आहे, असंही गडकरी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकार पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ’; देवेंद्र फडणवीसांचं महत्वाचं विधान
- ‘तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचे हाल का?’; फडणवीस आक्रमक
- ‘पवारांच्या पे रोलवर राहून बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’
- पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू ‘या’ पक्षाचा असू शकतात मुख्यमंत्री पदाचा चेहरा
- ठाकरे सरकारचं ठरलं ! पावसाळी अधिवेशन दोन दिवसातच उरकणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

