मुंबई – कोरोना प्रादुर्भावाचं कारण देत महाविकार आघाडी सरकारने यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा विरोधकांनी निषेध केला आहे. संतापजनक बाब म्हणजे ५ आणि ६ जुलै रोजी राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होणार असून, अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी वगळण्यात आल्या आहेत.
एकाबाजूला राज्यात चक्रीवादळग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा आहे, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, कोरोना काळातील भ्रष्टाचार, आशा वर्कर्स, धनगर आरक्षण, प्रलंबित नियुक्त्या, एमपीएससी परीक्षा, कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या आकड्यांची लपवाछपवी, परिचारिकांसह कोरोना योद्ध्यांचे मानधन, कायदा सुव्यवस्था अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा आणि सरकारने उत्तर देणं अपेक्षित असताना कोरोनाचं कारण देत अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मराठा आरक्षणाचा अद्याप तिढा सुटलेला नाही. याबाबत पावसाळी अधिवेशनात देखील चर्चा होऊ नये, याकरता कोरोनाचे कारण देत राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने दोन दिवसाचे अधिवेशन ठेवले असल्याचा देखील आरोप केला जात आहे.
एका बाजूला कोरोनाची लाट ओसरत असल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसत असताना मग सरकार हा पळपुटेपणा का करत आहे असा सवाल उपस्थित होत आहे. या अधिवेशनापेक्षा मागील अधिवेशन काळात कोरोनाची गंभीर परिस्थिती असून देखील अधिवेशनाचा काळ या अधिवेशनापेक्षा जास्त होता मग आता सरकारकडून ही भूमिका का घेण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे.
“करोनाचा आजार गंभीर आहे. त्याबद्दल सर्व प्रकारची काळजी घेतली पाहिजे. आम्हीही सरकारला मदत करतोय. पण, करोनाचा बहाणा करून अधिवेशन घ्यायचं नाही, असा प्रयत्न सरकार करत असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. एकीकडे हजारोंच्या उपस्थितीत कार्यालयाचं उद्घाटन होऊ शकतं. दुसरीकडे बारमध्ये कितीही लोक गेले तरी चालत. पण, राज्याच्या विधिमंडळामध्ये करोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचं नाही, ही सरकारची मानसिकता आहे. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा प्रस्ताव सरकारचा आहे. त्यामुळे कामकाज समितीतून आम्ही बाहेर पडलो आहे,” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या
- ‘बावनकुळेंचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची गरज नाही’, विनायक राऊतांचा टोला
- ‘पवारांच्या पे रोलवर राहून बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’
- पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू ‘या’ पक्षाचा असू शकतात मुख्यमंत्री पदाचा चेहरा
- विनोदी असो वा गंभीर भूमिका, सशक्त अभिनयाचा वारसा, मंकरद अनासपुरे!
- ज्या राष्ट्र मंचाच्या बॅनरखाली पवारांच्या निवासस्थानी बैठक होत आहे तो नेमका तरी काय आहे?

