Share

‘तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचे हाल का?’; फडणवीस आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना संकटाचं कारण देत गेल्यावर्षीपासून महाविकास आघाडी सरकारने अधिवेशन पूर्णकाळ न घेता ५-६ दिवसातच गुंडाळलं. आता येणारे पावसाळी अधिवेशन हे ५ जुलै पासून सुरु होणार आहे. हे अधिवेशन पूर्णकाळ घ्यावं अशी मागणी भाजपने केली आहे. मात्र, ठाकरे सरकारने हे अधिवेशन केवळ दोन दिवसांतच उरकण्याचा निर्णय घेतला आहे.

5 आणि 6 जुलै रोजी पावसाळी अधिवेशन होणार आहे. कोरोना संकटामुळे केवळ 2 दिवसांचं अधिवेशन होणार असल्याची माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. सर्वाधिक आमदार असून देखील विरोधी बाकावर असलेल्या भाजपने आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही. खासकरून विधिमंडळ अधिवेशनात कोरोना काळातील भ्रष्टाचार, आरक्षण, शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, मंत्र्यांवर होणारे आरोप, सरकारची कामगिरी यावरून भाजपने हल्लाबोल केल्याचं दिसून आलं.

आता राज्यात चक्रीवादळग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, कोरोना काळातील भ्रष्टाचार, आशा वर्कर्स, धनगर आरक्षण, प्रलंबित नियुक्त्या, एमपीएससी परीक्षा, कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या आकड्यांची लपवाछपवी, परिचारिकांसह कोरोना योद्ध्यांचे मानधन, कायदा सुव्यवस्था, सत्ताधारी पक्षांतील मतभेद आणि त्यामुळे निर्णयांवरून जनतेच्या मनात होणारा संभ्रम असे अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा आणि सरकारने उत्तर देणं अपेक्षित असताना कोरोनाचं कारण देत अधिवेशन गुंडाळण्याच्या मुद्द्यावरून विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पुढील महिन्यात म्हणजे ५ आणि ६ जुलै रोजी असं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भाजपाने बैठकीतून बहिष्कार टाकत सभात्याग केला. यानंतर माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का?’ असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय. जेव्हा जेव्हा अधिवेशन जवळ येतं, तेव्हा कोरोना वाढल्याच्या बातम्या किंवा भूमिका राज्य सरकारकडून केला जातोय. कोरोनाचा बहाना पुढे घेऊन राज्याचं अधिवेशनच घेऊ नये असा सरकारचा प्रयत्न आहे. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा सरकारचा डाव आहे. एकीकडे राज्यात हजारोंच्या संख्येने पक्ष कार्यालय उद्घाटन चालतं. मग अधिवेशन का नाही?’ असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!