🕒 1 min read
नवी दिल्ली : अण्वस्त्रांचा उल्लेख करून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे नेहमीच भारताला युद्धाची धमकी देण्याचा प्रयत्न करतात. पण आता पुन्हा एकदाइम्रान खान यांनी अण्वस्त्रांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. काश्मीर मुद्याबाबत तोडगा निघाल्यास अण्वस्त्रांची आवश्यकता भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तान अणुशस्त्रांबाबतीत पूर्णपणे सज्ज असून देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक शस्त्रसाठा उपलब्ध आहे आणि काश्मीरप्रश्न सुटला तर अणुशस्त्रांची गरजच भासणार नाही, असं विधान इम्रान खान यांनी केलं आहे. यासोबत अमेरिकेची जर इच्छा आणि संकल्प केला तर काश्मीरप्रश्न नक्कीच सुटू शकतो, अशी गळही इम्रान खान यांनी अमेरिकेला घातली आहे.
पाकिस्तानकडे असलेले अण्वस्त्रे ही आमच्या सुरक्षेसाठी असल्याचे खान यांनी म्हटले. तुमचा शेजारचा देश सातपटीने मोठा असल्यावर तुम्ही चिंतेत असणे स्वाभाविक आहे. मी अण्वस्त्रांविरोधात आहे. पाकिस्तान आणि भारतादरम्यान तीन वेळेस युद्ध झाली आहेत. त्यानंतर आमच्याकडे अण्वस्त्रे आहेत आणि तेव्हापासून एकही युद्ध झाले नसल्याचे खान यांनी एका विदेशी वृत्तवाहिणीली दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
पाकिस्तानकडे १६५ अण्वस्त्रे
पाकिस्तानच्या शस्त्रसाठ्यात सध्या १६५ अण्वस्त्र असल्याची माहिती समोर आली आहे. यात आणखी वाढ करण्याचा मनसुबा पाकिस्तानचा आहे. स्टॉकहोल्म आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेनं (एसआयपीआरआय) यासंबंधीची माहिती जाहीर केली आहे.
अमेरिकेच्या मध्यस्थीला भारताचा विरोध
यापूर्वी देखील इम्रान खान यांनी काश्मीर मुद्यावर अमेरिकेने मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्सुकताही दाखवली होती. मात्र, भारताने याला विरोध केल्यानंतर ही चर्चा थांबली. जम्मू-काश्मीरचा मुद्या हा दोन देशांमधील प्रश्न असून दोन्ही देशांच्या पुढाकाराने यावर तोडगा काढला जाऊ शकतो अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘बावनकुळेंचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची गरज नाही’, विनायक राऊतांचा टोला
- ‘पवारांच्या पे रोलवर राहून बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’
- पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू ‘या’ पक्षाचा असू शकतात मुख्यमंत्री पदाचा चेहरा
- विनोदी असो वा गंभीर भूमिका, सशक्त अभिनयाचा वारसा, मंकरद अनासपुरे!
- ज्या राष्ट्र मंचाच्या बॅनरखाली पवारांच्या निवासस्थानी बैठक होत आहे तो नेमका तरी काय आहे?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
