Share

धक्कादायक : शिर्डीमध्ये ६ महिन्याच्या मुलीला म्युकरमायकोसीसने हिरावलं

Published On: 

🕒 1 min read

शिर्डी : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात अवघ्या 6 महिन्याच्या मुलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने तीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शिर्डी येथे राहणाऱ्या कोरके यांच्या कुटुंबातील सहा महिन्याच्या श्रद्धा कोरके या मुलीला कोरोनाची लक्षणे असल्याने तिच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते.

मात्र उपचाराअंती चिमुरडीने कोरोनावर मात केली. कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला होता. पण म्युकरमायकोसीसची लक्षणे दिसून आली. यानंतर तिच्या कुटुंबियांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले. दरम्यान १३ तारखेला तिला लोणी येथील प्रवरा हाॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मात्र उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्युकरमायकोसीस जास्त प्रमाणात पसरल्याने तिच्यावर सर्जरी करणंही शक्य नव्हतं. अथक प्रयत्नांनंतरही डॉक्टरांना अपयश आले आणि तीचा आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान आता या घटनेमुळे सध्या परिसरातील नागरिकांनी शोकांतिका व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!