Share

न्युझीलंड विरुद्धच्या मालिकेआधी इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का; यष्टीरक्षक बेन फोक्स दुखापतग्रस्त

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आगामी जुन महिन्यात इंग्लंडच्या संघाला न्युझीलंड विरुद्ध २ कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे. या मालिकेआधी इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर अजुनही दुखापतीतून सावरला नाही. त्यातच इंग्लंडच्या संघाची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर येत आहे.

इंग्लंडच्या कसोटी संघाचा मुख्य यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्स हा दुखापतग्रस्त झाला आहे. बेन फोक्सच्या डाव्या हेमस्ट्रिंगला दुखापत झाली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन ही माहिती दिली आहे. या दुखापतीमुळे फोक्स जवळजवळ पुढील तीन आठवडे मैदानावर खेळू शकणार नाही अशी माहिती त्यांनी दिली. जखमी फोक्सच्या इंग्लंडच्या संघात जागी आक्रमक युवा खेळाडू सॅम बिलिंग्जचा समावेश करण्यात आला आहे.

मार्च मध्ये भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात फोक्सने शानदार यष्टिरक्षण केले होते. फोक्स आगामी न्युझीलंड विरुद्धच्या मालिकेत संघाचा प्रमुख यष्टिरक्षक होता. विशेष म्हणजे फोक्सचा हा इंग्लंड मधील पहिलाच कसोटी सामना होता. यापूर्वीचे आठही कसोटी सामने त्याने इंग्लंड बाहेर खेळलेले आहेत. आगामी काळात इंग्लंडला न्युझीलंड विरुद्ध २ कसोटी सामने आणि त्यानंतर भारताविरुद्ध ५ कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!