Share

वयाच्या ४५व्या वर्षी ‘या’ खेळाडूने केली शतकीय खेळी, चौकार आणि षटकारांचा पाडला पाऊस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रिकेटमध्ये धडाकेबाज खेळी करण्यात युवा खेळाडू अग्रेसर असतात. मात्र एबी डिव्हीलीयर्स सारखे काही खेळाडू याला अपवाद असतात. ३७ वर्षाचा एबी अजुनही युवा खेळाडूप्रमाणे फलंदाजी करताना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडतो. मात्र इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एक कौंटी सामन्यात एका ४५ वर्षीय खेळाडूने तब्बल १९० धावांची खेळी साकारली.

केंट विरुद्ध ग्लेनमार्ग संघात झालेल्या सामन्यात त्याने ही खेळी साकारली. केंटच्या संघातील इतर खेळाडू ज्या खेळपट्टीवर अपयशी ठरले. त्याच खेळपट्टीवर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत केंटचा डॅरेन स्टीवन्स याने १९० धावांची खेळी करत ३६वे शतक पुर्ण केले. महत्वाची बाब म्हणजे त्याने १९० धावा केवळ १४९ चेंडुत काढल्या. या खेळीदरम्यान स्टीवन्सने १५ चौकार आणि १५ षटकारांची बरसात केली.

स्टीवन्सच्या खेळीमुळे एकवेळ ८ बाद १२८ अशा बीकट अवस्थेत होता. मात्र स्टीवन्सच्या खेळीमुळे केंटला ३०७ धावांपर्यंत मजल मारता आली. महत्वाची बाब म्हणजे त्याने ही खेळी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना साकारली. या सामन्यात केंटचे इतर खेळाडू सपशेल अपयशी ठरताना त्याने ही तुफान खेळी केली. वयाच्या ४५ व्या वर्षी डॅरेनने केलेल्या या खेळीमुळे सर्वस्तरातुन त्याचे कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!