Share

‘खासगी रुग्णलयांत होणारी फसवणूक टाळण्यासाठी ऑडीटर नेमण्यासाठी जिल्हाप्रशासनाने पावले उचलावीत’

Published On: 

मुंबई : राज्याने आजपर्यंत कधीही कोरोनाची आकडेवारी लपवलेली नाही त्यामुळे राज्याने देशात उत्तम काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. पेडियाट्रीक टास्कफोर्सच्या सूचना सर्व जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने घेण्याची गरज आहे. आजपर्यंतच्या या कामाचे श्रेय प्रशासनास जाते असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

टाळेबंदी असूनही राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची साथ अटोक्यात येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल एका बैठक झाली. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, पोलीस महासंचालक संजय पाण्डेय, वैद्यकीय शिक्षणचे प्रधानसचिव सौरभ विजय, आयुक्त रामास्वामी एन, अपर मुख्य सचिव, डॉ. नितिन करीर, अधिष्ठाता जे. जे. समूह रुग्णालय, डॉ. तात्याराव लहाने, आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी  आरोग्यमंत्री बोलत होते.

टोपे म्हणाले, म्यूकरमायसीस (काळी बुरशी) हा आजार राज्यात नोटीफाईड डिसीज ठरणार आहे. कोरोना टेस्टिंग हाय आणि लो रिस्कमध्येच वाढवली पाहिजे. टेस्टींग कुठे केल्या जातात हेही महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यामुळे उपचार लवकर मिळून मृत्यूदर कमी होण्यास मदत हाते. ग्रामीण आणि तालुकास्तरीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आयसीयू बेडची गरज असून. शासन आगामी काळात त्यासाठी प्रयत्नशील आहे. लस जशी उपलब्ध होईल त्याप्रमाणे लसीकरण सुरुच राहणार आहे. खासगी रुग्णलयांत होणारी फसवणूक टाळण्यासाठी ऑडीटर नेमण्यासाठी जिल्हाप्रशासनाने पावले उचलावीत. गृह विलगीकरणाचे प्रमाण कमी करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर द्यावा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी डॅशबोर्ड अद्ययावत ठेवावा.रुग्णसंख्या नेमक्या कोणत्या भागात वाढते याचे विश्लेषण करावे, रुग्णवाढीची कारणे समजावून घेवून त्यानुसार उपाययोजना कराव्या, लग्न समारंभासारख्या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष द्यावे, असेही टोपे यांनी सांगितले.

घरगुती विलगीकरणातील लोकांमुळे अधिकाधिक रुग्ण वाढत असल्याचे आढळून येत असल्याने त्यावर तातडीने, उपायोजना करण्याची गरज आहे तसेच ते नियमांचे काटेकोर पालन करतात की नाही याचे मॉनेटरींग करण्याची गरज आहे,शेजारील जिल्हे, राज्यातून येणाऱ्या स्थलांतरीत लोकसमुहाचे नियमित सर्वेक्षण करावे, खासगी रुग्णालयांनी रुग्णांचे शोषण करु नये यासाठी योग्य ती पावले उचालावीत,ज्या कुटुंबातील कमावते लोक कोविडमुळे मृत्यूमुखी पडले आहेत अशा कुटूंबाना मदतीसाठी धोरण ठरवावे. विविध शासकीय योजना सीएसआर योजनांचा फायदा अशा कुटूंबांना कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावे. अशा सूचना यावेळी मांडण्यात आल्या.

दरम्यान, यावेळी बोलताना, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यातील कोरोना रुग्णवाढ लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी तसेच सामूहिक प्रयत्न करण्‍याची गरज असल्याचे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. रुग्णवाढ रोखण्यात अपयश आल्यास पुढील काळात त्याचा फटका सर्वसामान्य तसेच आरोग्य, प्रशासन यंत्रणांना बसू शकतो. परिस्थितीनुसार अधिकाधिक टेस्ट, ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा, गर्दी होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. टेस्टची संख्या कमी केल्याने अनेकदा रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचे दिसते प्रत्यक्षात तसे करणे धोकादायक ठरते, गडचिरोली, अमरावती जिल्ह्यातील आदीवासी भागातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याच्या सूचना थोरात यांनी केल्या.

दरम्यान, राज्यातील बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद या 15 जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यूदर अधिक असून तो कसा कमी करता येईल याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!