मुंबई: अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत आहे. मुलगा रेयांश याच्यावरून तिचा दुसरा पती अभिनव कोहली आणि तिच्यात सतत वाद होत आहेत. अभिनवनं श्वेतावर मुलाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर श्वेताचे पहिले पती अभिनेते राजा चौधरी श्वेताच्या बाजूनं उभे राहिले असून, श्वेता खूप चांगली आई आणि चांगली पत्नीही असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राजा यांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना सांगितलं की, ‘श्वेताचे दोन्ही विवाह यशस्वी ठरले नाहीत, हे तिचं दुर्दैव आहे; पण याचा अर्थ असा नाही की ती वाईट आहे. श्वेता खूप चांगली आई आणि उत्तम पत्नीही आहे. श्वेता आणि अभिनव यांच्यात काय चालले आहे यावर मी काही बोलू शकत नाही; पण मला असं वाटतं की श्वेतानं अभिनवला आपल्या मुलाला भेटण्याची परवानगी द्यावी. तिच्या आणि अभिनवमध्ये समस्या असल्या तरी एक पिता आपल्या मुलाला किंवा मुलीला कधीही दुखवू शकत नाहीत. हे श्वेतानं समजून घेतलं पाहिजे,’ असं राजा चौधरी यांनी सांगितलं होते. श्वेताने अभिनवशी लग्न करण्यापूर्वी राजा चौधरीशी लग्न केले होते. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता.
काही दिवसांपूर्वीच श्वेता तिवारीनं सोशल मीडियावर आपल्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज अपलोड करून पती अभिनव याच्यावर गंभीर आरोप केले. या व्हिडिओमध्ये अभिनव श्वेताकडून मुलगा रेयांश याला खेचताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक कलाकारांनी श्वेताला पाठिंबा व्यक्त करत अभिनवच्या अटकेची मागणी केली. सध्या श्वेता दक्षिण आफ्रिकेत केपटाउनमध्ये ‘खतरों के खिलाड़ी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून इथे जाण्यास देखील तिच्या पतीने तिला मनाई केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘महा विकास आघाडी कोकणातल्या शेतकरी बांधव व नागरिकांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे’
- शेतकऱ्यांना जुन्याच भावाने खत उपलब्ध केल्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी मानले मोदींचे आभार
- अखेर रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्याच्या प्रक्रियेला ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात
- भाजपा मुंबई महानगरपालिकेविरोधात सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार
- मोदींना चारवेळा पत्र दिले, अद्याप भेट दिली नाही; संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
