🕒 1 min read
जालना : कोरोनाचे महासंकट एकीकडे तर दुसरीकडे अवैध धंदे. प्रशासनाने संचारबंदी व वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत की या अवैध धंद्यांकडे लक्ष द्यावे, असा प्रश्न समोर उभा राहिला आहे. परतूर तालुक्यातील गोळेगाव येथील गोदावरी नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा सुरु असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे.
गोळेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे केल्या आहेत. त्यानुसार महसूल विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या उपस्थितीत बुधवारी स्थळ पाहणी करून पंचनामा केला. अंदाजे चारशे ते पाचशे ब्रास वाळूची या ठिकाणाहून चोरी झाली असून शिवाय वाळू वाहतुकीसाठी काही शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ताही करण्यात आल्याचा उल्लेख या पंचनाम्यात करण्यात आला आहे.
मंडळ अधिकारी बी. के. घुगे, तलाठी के. के. वावरे यांनी पोलिस पाटील, कोतवाल, पंच यांच्यासह येथील गोदावरी नदीपात्राच्या उत्तर बाजूस गट क्रमांक-३०४ मध्ये शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. या ठिकाणी दक्षिण बाजूस गोदावरी नदीपात्र असून केवळ वाहतूक करण्याच्या उद्देशाने रस्ता केल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे.
तसेच रस्त्याच्या समोर शेतातून केवळ वाळू वाहतुकीसाठी रस्ता करून या रस्त्यावरून अंदाजे रात्री नदी पात्रातून चारशे ते पाचशे ब्रास वाळू उपसा केल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. ज्या शेतातून रस्ता केला ते शेतकरी सांगतात की वाळू वाहतुकीच्या वाहनासोबत दहा-बारा तरुण मद्यप्राशन केलेले असतात. तसेच रस्ता अडवल्यास ते धमकावतात.
महत्वाच्या बातम्या
- अखेर आन्वा प्रशासनाला आली जाग; पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू
- शेतकऱ्यांना जुन्याच भावाने खत उपलब्ध केल्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी मानले मोदींचे आभार
- ‘महा विकास आघाडी कोकणातल्या शेतकरी बांधव व नागरिकांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे’
- भाजपा मुंबई महानगरपालिकेविरोधात सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार
- मोदींना चारवेळा पत्र दिले, अद्याप भेट दिली नाही; संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
