🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. या सामन्यात भारत आणि न्युझीलंड हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे आहेत. इंग्लंडमधील साउथहॅम्पटन येथे १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना होणार आहे. तसेच यावेळी भारतीय संघासोबत भारतीय महिला क्रिकेट संघही इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारताचे महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट संघ हे एकाच विमानाने इंग्लंडला रवाना होतील.
मात्र भारतातून निघण्याआधी बीसीसीआयने महिला आणि पुरुष संघासाठी वेगवेगळे नियम केले आहे. इंग्लंड दौऱ्याला निघण्यापुर्वी बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाच्या सदस्यांना मुंबईत विलगीकरणासाठी १९ मे रोजी एकत्र येण्यास सांगितले आणि याआधी त्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक ठेवले आहे. मात्र याच वेळी पुरुष संघाला एकत्र येण्यासाठी २४ मे ला सांगितले असुन त्यांची कोरोना चाचणी ही खेळाडूंच्या घरीच करण्याची व्यवस्था केली आहे. मात्र हीच सुविधा महिला क्रिकेटपटुंना नाही दिली. महिला खेळाडुंना स्वत: वैयक्तिक पातळीवर जाउन ही चाचणी करावी लागणार आहे. बीसीसीआयच्या एका सुत्राने ही माहिती दिली आहे.
भारताचा पुरुष क्रिकेट संघ प्रथम न्युझीलंड सोबत जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना आणि यानंतर इंग्लंडसोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. तर महिला क्रिकेट संघ हा इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघासोबत कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. २ जून रोजी हे दोन्ही संघ एकाच चार्टर्ड विमानाने इंग्लंडला रवाना होतील.
महत्त्वाच्या बातम्या
- सावध ! सोनू सूदचं चाहत्यांना सतर्कतेचं आवाहन
- आर अश्विनकडून नकळत झाली मोठी चूक ; सोशल मीडियावर मागितली सर्वांची माफी
- डब्लुटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळायला उतरताच, भारतीय संघ बदलणार ८९ वर्षे जुना ‘हा’ इतिहास
- ‘फडणवीसांनी इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा, वणवण फिरण्यापेक्षा नागपुरातच बसावं’
- परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांवर आता CID करणार चौकशी ; अडचणी वाढणार?

