🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. अंबानी स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी सचिन वाझे याचे नाव आल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात अली होती. यानंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून हे गंभीर आरोप केले होते.
दरम्यान, या सर्व प्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी सुरु असून अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु हे प्रकरण घडताच परमबीर सिंग यांच्यावर एकापाठोपाठ एक अनेक ताकारी विविध ठिकणी नोंदवण्यात आल्या होत्या .ठाणे शहर पोलीस आयुक्तपदावर असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. या तक्रारीत भिमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यासोबतच 27 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
परमबीर सिंग यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी दाखल केलेल्या प्रकरणाची चौकशी सीआयडी पथकाने सुरू केली आहे. या प्रकरणात सीआयडीच्या टीमने तक्रारदार असलेले पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
परमबीर सिंग यांच्यासह इतर 27 पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच विरारचे व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आरोप केला आहे. २०१७ मध्ये पोलिसांनी घरावर दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यामुळे आता परमबीर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- विनाकारण फिरणाऱ्या ९८ नागरिकांची कोरोना तपासणी, २ पॉझिटिव्ह!
- ‘याचा कचरा करायला शब्दच नाहीत; थर्माकोलची तलवार घेऊन मिटकरी आकाशाला खुन्नस देतोय !’
- कोरोनावर उपायकारक ‘2-डीजी’ या भारतीय औषधाचे राजनाथ सिंह यांनी केले लोकार्पण
- आणखी दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन
- तौक्तेचा परिणाम, नाथसागर जलाशयात हजारो माशांचा अचानक मृत्यू!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
