उस्मानाबाद : कोरोनाच्या उद्रेकामुळे शुक्रवारपासून ३१ मेपर्यंत ब्रेक द चेनसाठी शिवसैनिक आणि प्रशासन गावपातळीपासून काम करेल. ज्या तालुक्यात रूग्णसंख्या कमी होईल, त्या तालुकाप्रमुखास पाच लाखांचे बक्षीस दिले जाईल, शिवाय त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे उपनेते तथा आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ब्रेक द चेन अभियानासंदर्भात माहिती देण्यासाठी डॉ. तानाजी सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरेानाची साथ वाढत आहे, अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चेन ब्रेक का होत नाही, याचाही विचार केला. टीका करण्याची ही वेळ नाही, मात्र, प्रशासनाने लोकप्रतिनिधींसोबत समन्वय साधत काम करण्याची गरज असल्याचे आमदार सावंत म्हणाले.
शिवसेनेने ८० टक्के समाजकारण केले आहे, या भूमिकेतूनच ब्रेक द चैन अभियान राबविण्यात येत आहे. ३१ तारखेपर्यंत कोरेानाची चैन ब्रेक करणारा उस्मानाबाद हा महाराष्ट्रातला एक नंबरचा जिल्हा असेल, असे नियोजन करण्यात आल्याचे डॉ.सावंत यांनी सांगितले. तसेच ज्या तालुक्यात रुग्णसंख्या सर्वात कमी असेल, त्या तालुकाप्रमुखांना पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- नागरिकांसाठी लस पुरवण्याबाबत शिवसेना खा.ओमराजे निंबाळकरांचे मोदींना पत्र
- मराठा आरक्षणावरील ‘ती’ पोस्ट भोवली, दादासाहेब मुंडे काँग्रेसमधून निलंबित
- करणीच्या नावाखाली महिलेची सहा लाखांची फसवणूक, भोंदूबाबावर गुन्हा
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- ‘देशाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू’, संजय राऊतांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

