Share

…तर त्यांना बाजूला घेऊन नाराजी सांगेन; कथित नाराजी नाट्यावर अजितदादांच खटक्यावर बोट !

Published On: 

पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हा आढावा बैठक पार पडली आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कथित नाराजी प्रकरणावर भाष्य केलं आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जयंत पाटील हे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर संतापल्याच वृत्त काही वाहिन्यांनी दिलं होतं.

यावरून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचं देखील काल बोललं जात होतं. यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडल्याच्या चर्चा होत्या. याप्रकरणी आता अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ‘जयंत पाटील शांत स्वभावाचे आहेत, मीच उलट तापट स्वभावाचा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील राज्याच्या मुख्य सचिवांवर संतापले या बातम्यांमध्ये तथ्य नाही,’ असं ते म्हणाले.

तर, ‘मी नाराजी स्पष्टपणे तोंडावर सांगतो. मला कोणत्या अधिकाऱ्याला बोलायचं झालं तर त्याला बाजूला घेऊन नाराजी सांगेन. जर विषय माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल तर तेच उत्तर देतील. परंतु जयंत पाटील सीनियर नेते आहेत. जयंत पाटील यांनी अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे. अधिकाऱ्यांकडून काम कसं करुन घ्यायचे हे त्यांना चांगलं ठाऊक आहे,’ असंही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!