Share

‘लस तर नाही, मग त्या कॉलरट्युन का वाजवत आहात?’ दिल्ली हायकोर्टाने केंद्राला खडसावले

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे. वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर ताण येऊन त्या अपुऱ्या पडत असल्याचे चित्र सध्या देशभरात आहे. ऑक्सिजन आणि बेड्सची कमी असल्याचे काही दिवसापूर्वी पहायला मिळत होते. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणाचा पर्याय सध्या समोर आहे. अशातच देशात मोठ्या प्रमाणावर लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राकडून लस पुरवठा होत नसल्याचा आरोप अनेक राज्यांनी केला आहे. लसीच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. ‘लसीच नाहीत तर ती लसीकरणाची कॉलरट्युन का लावून ठेवली आहे? कोण घेईल लस? अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला खडसावले आहे. देशात लसीकऱणाचा बोजवारा उडालेला आहे. जवळपास सर्वच राज्यांना लसीकरणासंदर्भातल्या समस्यांचा सामना करावा लागतोय. अनेक ठिकाणी लसच उपलब्ध नाही. यावरुन दिल्ली हायकोर्टाने केंद्राला खडसावलेय. ‘लसीकरण सुरु नसताना तुम्ही लस घ्या सांगणारी कॉलरट्युन लावून ठेवली आहे. लस उपलब्धच नाही तर लस कोण घेईल’ असा प्रश्न न्यायालयाने केंद्राला विचारला आहे.

कोरोनाचा प्रकोप जगासह भारतातही वाढत आहे. देशात सध्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. पण देशातील अनेक राज्यात लसींचा तुटवडा जाणवत असल्यामुळे लसीकरणाला खीळ बसली आहे. भारतातील लोक करोनासोबत मोठी लढाई लढत आहेत. कोरोनामुळे देशभर परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. पण देशात लसींचा तुटवडा जाणवतोय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!