Share

‘माझ्यावर बोलणारे वारकरी नव्हे, ते भाजपचे चमचे’, आ.संजय गायकवाडांनी वारकरी संप्रदायाला डिवचले

Published On: 

🕒 1 min read

बुलडाणा : काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर असभ्य भाषेत टिका केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. बुलडाणा जिल्ह्यात तर हाणामारीपर्यंत हे प्रकरण गेले. दरम्यान, ते प्रकरण शांत होते न होते तेच आ.गायकवाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

‘कोरोना काळात मंदिरे बंद आहेत, तुम्हाला वाचवण्यास कोणी येणार नाही. उपास-तापास बंद करा, अंडे-मटन खा, मुस्लिमांमध्ये कोरोनामुळे क्रिटिकल होण्याचे प्रमाण कमी आहे, कारण ते सातत्याने प्रोटीनयुक्त आहार घेत असतात असे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले. त्यामुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुचा अवमान केल्याच्या प्रतिक्रिया वारकरी संप्रदायातून उमटू लागल्या. ह.भ.प रोहिणीताई राऊत संगमनेरकर, भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले, महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प प्रकाश महाराज जवंजाळ,गजानन महाराज दहीकर, भाजप अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोकळ, वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार ह.भ.प.प्रशांत महाराज पाटील यांच्यासह अनेकांनी आमदार गायकवाड यांचा निषेध केला.

यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड म्हणाले की, मी चुकीचे काही बोललेलो नाहीये. मी जे वक्तव्य केले त्यावर ठामच आहे. तसेच ‘बोलणारे हे वारकरी नाहीत तर भाजपचे वारकरी आघाडीतील चमचे आहेत’ अशी टीका त्यांनी केली. गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे अगोदरच वारकरी सांप्रदायात नाराजी पसरली आहे. त्यातच भाजपचे चमचे असे हिनवत वारकऱ्यांची अवहेलना केल्याने हा वाद आणखी पेटणार अशी चिन्हे आहेत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आमदारांना आवर घालावा अशी मागणीही जोर धरतेय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!