Share

‘सुप्रीम कोर्टाने आता समांतर केंद्र सरकारही तयार करावे’, काँग्रेसची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १७ कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस मिळत नाही. लसीकरणात देशभरात सुसुत्रता दिसत नाही म्हणून केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचे राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे

तसेच ‘कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यालायलाने टास्क फोर्स बनवण्याचे आदेश दिले आहे. पण मला असं वाटतं की केवळ टास्क फोर्सच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला समांतर असे एक केंद्र सरकारदेखील सर्वोच्च न्यायालयाने तयार करावे. कारण मोदींचे सरकार लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी असमर्थ ठरताना दिसत आहे. संविधानमध्ये अशी तरतूद आधीच करून ठेवण्यात आल्याचे पटोले यांनी सांगितले.

मोदींचे आपत्ती धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन किती पोकळ आहे याची जागतिक प्रसारमाध्यमांनी पोलखोल केली आहे. कोविड महामारीचे संकट मोदी सरकार हाताळू शकत नाही असा संदेश जगभरात गेला असून भारत एक जागतिक शक्ती म्हणून जगासमोर उभा राहिला होता पण मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा तसेच नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की झाली आहे. विरोधकांनी केलेल्या सुचनांवर अंमलबजावणी केली असती तर आज दिसत असलेले भयनाक दृश्य पहावे लागले नसते. हजारो-लाखो जीव वाचले असते तसेच भारताची जगात एवढी नाचक्की झाली नसती, असेही पटोले म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!