Share

पाणीपुरवठा विस्कळीत! पंपहाऊसचा विजपुरवठा खंडीत होणार नाही यांची दक्षता महावितरणने घ्यावी, पैठण तहसीलदारांचे आदेश

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : विद्युत विभागाकडून वारंवार पंपहाऊसचा विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने नगरअध्यक्ष सुरज लोळगे यांच्या तक्रारीवरुन तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी महावितरणचे अधिकारी व नपच्या नगरसेवकांची मंगळवारी दि.११ बैठक आयोजीत करत. यापुढे पंपहाऊसचा विजपुरवठा खंडीत होणार नाही यांची दक्षता महावितरणने घ्यावी असे आदेश या बैठकीत तहसिलदारांनी दिले. या बैठकीत बोलतांना नगरअध्यक्ष सुरज लोळगे यांनी महावितरणच्या अधिकारी व लाईनमनच्या तक्रारीचा पाढाच वाचला केवळ महावितरणच्या आधिका-यांच्या व कर्मचा-यांच्या नाकर्तेपणामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे स्पस्ट केले.

सद्यस्थीतीत सर्वच विभागाचा महावितरणचा विद्युतपुरवठा खंडीत होत असल्याने, शहरात विजेचा प्रश्न निर्माण झालेला असुन कधीही शहरातील विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याची तक्रार महेश जोशी यांनी यावेळी बोलतांना केली. यावेळी पाणीपुरवठा सभापती अजीत पगारे, शिवसेनेचे गटनेते तुषार पाटील, राकॉंचे गटनेते कल्याण भुकेले, काँग्रेसचे गटनेते हसनोद्दीन कठ्यारे, नगरसेवक प्रकाश वानोळे, ज्ञानेश घोडके, नगरसेविका पुष्पा वानोळे, कृष्णा मापारी, अस्लम पठाण, सम्राट वानोळे, पाणीपुरवठा निरीक्षक व्यांकटी पापुलवाड, पाणीपुरवठा अभियंता यशवंत मुंढे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिपक माने, उपअभियंता कल्याण रंधे, जायकवाडीचे अभियंता शंकर वाघ, शाखा अभियंता रोहीत तायडे आदींची उपस्थीती होती.

यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिपक माने यांनी सांगीतले की सध्या रमजानचे दोन दिवस गेल्या त्यानंतर विशेष असे मनुष्यबळ वापरुन पाणीपुरवठा विभागाला जोडणा-या विद्युत सप्लायच्या मार्गातील सर्वच आडथडे दुर करुन पाणीपुरवठा विभागाचा विद्युतपुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता महावितरण घेईल तसेच ईद होईपर्यंत पंपहाऊसचा विद्युतपुरवठा खंडीत होणार नाही याची पण दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन माने यांनी महावितरणच्या वतीने दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!