Share

खळबळजनक! अजित पवारांच्या निकटवर्तीय आमदारावर गोळीबार, ठेकेदारीच्या वादातून हल्ला?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला आहे. ही घटना आज बुधवारी दुपारी एकच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली. तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे समजते. आरोपीने पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या आहेत. ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही.

https://www.facebook.com/aamdarannabansode/posts/1823547914492124

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तुलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे.

गोळीबारानंतर अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया
अण्णा बनसोडे यांनी अँथनी नावाच्या ठेकेदाराला वार्डातील दोन मुलांना कामाला लावं म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी तो अरेरावी पद्धतीनं बोलला. सकाळी तो आला त्याच्यासोबत त्याचा मेव्हणा होता. त्या व्यक्तीनं गोळीबार केला. पण या प्रकरणामागे नेमकं काय आहे हे पोलिसांनी तपास केल्यानंतर समोर येईल, असं अण्णा बनसोडे म्हणाले.

कोण आहेत आमदार अण्णा बनसोडे?
अण्णा बनसोडे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला होता. अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे निकटवर्तीय मानले जातात.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!