🕒 1 min read
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. पण महाराष्ट्रात लसींचा तुटवडा भासतोय. यावरून राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला मिळणाऱ्या कोरोना लसीचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले आहे. या अनुषंगाने भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी एकाच शब्दाचा वारंवार उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर मिश्किल टीका केली आहे.
ट्विटमध्ये भातखळकर म्हणाले की, ‘लस उपलब्ध नाही कारण साठा नाही. साठा आहे पण लसीकरण होणार नाही.याचा अर्थ असा नाही की लसीकरण बंद आहे. लसीकरण सुरूच आहे. सर्वांना लस मिळेल. याचा अर्थ कुणीही जाऊन लस घेऊ शकतो असा नाही. नोंदणी करा मग लस मिळेल. पण नोंदणी केली तरी लस मिळेलच असं नाही. – पक्षाचे मुख्यमंत्री’.
लस उपलब्ध नाही कारण साठा नाही.
साठा आहे पण लसीकरण होणार नाही.याचा अर्थ असा नाही की लसीकरण बंद आहे. लसीकरण सुरूच आहे. सर्वांना लस मिळेल. याचा अर्थ कुणीही जाऊन लस घेऊ शकतो असा नाही. नोंदणी करा मग लस मिळेल. पण नोंदणी केली तरी लस मिळेलच असं नाही. ????– पक्षाचे मुख्यमंत्री
????— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 12, 2021
भातखळकर यांनी या प्रकारच्या संवादशैलीची खिल्ली उडवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला चिडवले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखीन गरम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईतील शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांनी भातखळकर यांच्यावर निशाणा साधत ‘कामे करण्यास मुंबई पालिका समर्थ आहे. जमल्यास तुम्ही आणि तुमच्यासारखे तुमच्यातलेच रिकामटेकडे यांनी श्रमदान करुन एक तरी छोटा नाला साफ करा. कोरोनाच्या काळात तेवढेच पुण्य खात्यावर जमा होईल.’ अशी टीका ट्विटरच्या माध्यमातून केली होती.
रिकामटेकडा घरी कडी लावून बसलेल्याना म्हणतात किंवा कोरोनाच्या काळात लोकं मरत असताना नाईटलाईफची काळजी करणाऱ्या टक्केवारीवाल्याना.
पालिका समर्थच आहे, पण सत्ताधारी मात्र निक्कमे आहेत. दर पावसाळ्यात हे दिसतेच.जनतेसाठी नालेच काय आम्ही राजकारणातली घाणसुद्धा साफ करण्याचे काम करीतच आहोत. https://t.co/38xrNkACUC— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 12, 2021
पण या टीकेनंतर आणि रिकामटेकडे म्हणल्यावर शांत बसतील ते भातखळकर कसले. त्यांनी थेट यशवंत जाधव यांच्या पक्षप्रमुखांवर हल्लाबोल करत पलटवार केलाय. ‘रिकामटेकडा घरी कडी लावून बसलेल्याना म्हणतात किंवा कोरोनाच्या काळात लोकं मरत असताना नाईटलाईफची काळजी करणाऱ्या टक्केवारीवाल्याना. पालिका समर्थच आहे, पण सत्ताधारी मात्र निक्कमे आहेत. दर पावसाळ्यात हे दिसतेच.जनतेसाठी नालेच काय आम्ही राजकारणातली घाणसुद्धा साफ करण्याचे काम करीतच आहोत.’ असे जाधवांना सुनावले.
महत्त्वाच्या बातम्या :
- पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करा-काँग्रेस
- राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला द्या, काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- आरोपमुक्त करण्याची विनंती करणे आरोपीचा अधिकार-सर्वोच्च न्यायालय
- ‘टीका करण्याऐवजी सल्ले द्या’, राजनाथ सिंहांचा काँग्रेसला टोला
- ‘घरी कडी लावून बसलेल्यांना रिकामटेकडा म्हणतात’, भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

