मुंबई : देश कोरोनाच्या महामारीशी लढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार प्रभावी उपाययोजनांना प्राधान्य देण्याऐवजी २० हजार कोटींच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला प्राधान्य देत असल्यावरून जगभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्यापासून ते राज्यातील विविध काँग्रेस नेत्यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींसह भाजपवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, भाजप नेते व ऍड. आशिष शेलार यांनी गांधी घराण्यावर टीका करत प्रत्युत्तर दिलं होतं. आता, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आशिष शेलार यांना खोचक टोला लगावला आहे. ‘भाजपचे आमदार आशिष शेलार सांगायचे जे पी नड्डा यांनी राहुल गांधी परिवार टीका केली, 70 वर्षांत काँग्रेसने काय केले, काँग्रेसने देश निर्माण केला आहे पण आता पंतप्रधान मोदी स्वत:चे घर उभे करत आहे,’ असा टोला पटोले यांनी लगावला आहे.
नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर लसीकरणावरून देखील निशाणा साधला आहे. ‘लोकांना वाचवण्यापेक्षा लोकांना संपवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकारने लशीबाबत खोटी माहिती कोर्टात सादर केली आहे,’ अशी टीका पटोले यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गावागावांतील सौरऊर्जावरील पथदिवे निघाले भंगारात, प्रशासनाची उदासीनता आली समोर
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

