🕒 1 min read
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील गावागावात ग्राम पंचायत व जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करून सौर ऊर्जा वरील पथदिवे बसवले होते. प्रत्येक गावातील पथदिव्यांची देखभाल अभावी दुरावस्था झाली आहे. सर्वच पथदिवे बंद अवस्थेत आहेत. तर काही पथदिवे चोरीला गेले, काही पथदिव्यांच्या बॅटरी चोरीला गेल्या, तर काही खराब झाल्या, तसेच काही ग्रामपंचायत ने बंद अवस्थेतील पथदिवे स्वतःहून काढून घेतले आहेत.
अनेक ग्रामपंचायतीने त्या पथदिव्यांच्या पाईप चा उपयोग कंपाउंड साठी केला .तर काही ग्रामपंचायत ने काढलेले पथदिवे ग्रामपंचायतच्या स्टोअर रूममध्ये गंज खात पडले आहेत. तर अनेक ठीकाणी रात्रीच्या वेळेला पथदिव्यांची चोरी होऊन त्याची विक्री झाली आहे. त्यामुळे सर्व पथदिवे बंद पडले आहेत. शासनाने घातलेला खर्च वायफळ गेला आहे.
भारनियमामुळे गावात अंघार पडतो व वीजेची बचत व्हावी, यावर मात करण्यासाठी प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर सौरदिवे बसवले होते. खेड्यापाड्यांमध्ये आठ ते दहा तास भारनियमन असताना गावे अंधारात राहतात, अशावेळी रात्री रस्त्यावरती गल्लोगल्ली प्रकाश रहावा यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून तालुक्यातील ४७ ग्राम पंचयत हद्दीत सौर ऊर्जेवरील दिवे बसवले होते.
त्यातील ७५ टक्के पथदिवे सहा-सात महिन्यांमध्येच बंद पडले होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वच ठीकाणी पथदिवे बंद आहेत. त्याची दुरुस्ती देखभाल ग्रामपंचायतीने बघितली नसल्यामुळे आता पथदिवे भंगारात निघाले आहेत. त्यामुळे शासनाच्या सौर उर्जेवर चालणाऱ्पयाथदिव्यांच्या योजनाच भंगारात चालली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

