🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रशाला मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळणा?्या प्रभारीनां विशेष वेतन देण्याची मागणी माध्यमिक शिक्षक भारतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका?Nयांकडे केली आहे औरंगाबाद जिल्ह्यातील ५५ पैकी ५४ प्रशालांमध्ये मुख्याध्यापक हे पद रिक्त आहे. हा पदभार शाळेत कार्यरत जेष्ठ माध्यमिक शिक्षकाकडे देण्यात आलेला आहे. माध्यमिक शिक्षक म्हणून नेहमीची अंगिकृत जबाबदारी सांभाळत प्रभारी पदाची नवी अतिरिक्त जबाबदारी पार शिक्षक पार पाडतात.
त्यासाठी अतिरिक्त विशेष वेतन देण्याची नियमात तरतूदही आहे. या पदभारामुळे माध्यमिक शिक्षकांच्या जबाबदारीत वाढ होते. राज्य स्थापनेपासून आजपर्यंत हे पद गटशिक्षणाधिकारी-उपशिक्षणाधिकारी आदी पदांच्या समकक्ष आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमिक प्रशाला विदर्भ-मरा’वाड्यात ज्यास्त संख्येनेआहेत. शासन दरबारी यांना माजी शासकीय शाळा म्हणतात. औरंगाबाद जिल्ह्यात उर्दू आणि मराठी माध्यमातून कला व विज्ञान शाखेचे उच्च माध्यमिक वर्गही चालवले जातात.
शिवाय बहुतांश ठीकाणी सेमी इंग्रजी तुन शिक्षण दिले जाते. जिल्ह्यातील माध्यमिक प्रशाला सातत्याने खाजगी शाळांची स्पर्धा करत आपल्या विद्यार्थी संख्येत भरीव वाढ करत आहेत.मात्र नेतृत्व कौशल्याधारे यशस्वी पदभार सांभाळनारे पदभारी अतिरिक्त विशेष वेतनापासून वंचित आहेत.माध्यमिक शिक्षकभारतीने केलेली विशेष वेतनाची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाने मान्य करावी. पूर्वलक्षी प्रभावाने विशेष वेतन अदा करण्याबाबतचे आदेश द्यावेत असा आग्रह संघटनेने धरला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…


